अन्नाचा व्यवसाय
मूळ लेखक : नीता देशपांडे काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या एका खेड्यात स्वयंसेवक म्हणून काम करताना तिथल्या दोन हसऱ्या किशोरींनी एक दिवस मला जेवायला बोलावलं. त्या तेव्हा रोज दुपारी शाळेत येऊन हिन्दी वर्णाक्षरे शिकायचा चिकाटीने प्रयत्न करीत असत. मी जेवायला बसले तसा एक प्रश्न माझ्या मनात आला, जो शहाण्या मुलींनी विचारायचा नसतो हे मला माहीत होतं. …